पुणे महापौर चषक बुध्दिबळ स्पर्धा २०२०

दिनांक: ०१/०३/२०२०

पुणेमहापौर चषक बुध्दिबळ स्पर्धा कोथरूडमधील वीर सावरकर मैदानात भव्य मंडपात 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 ला माननीय महापौर श्री मुरलीधर मोहोळ यांच्या संयोजनेने पाठिंब्याने या स्पर्धा आज दि ०१/०३/२०२० रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण ९५० च्यावर खेळाडूंनी भाग घेतला.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण पुणे शहराचे प्रथम नागरिक माननीय महापौर श्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते व माननीय आमदार श्री भीमराव आण्णा तापकीर, शहर अध्यक्ष भाजपा श्री जगदीश मुळीक, श्री राजेश पांडे संघटन सरचिटणीस भाजपा पुणे शहर, उपमहापौर सौ सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेविका सौ अल्पनाताई वरपे, अ‍ॅड. गणेश वरपे, या स्पर्धेच्या पारितोषक वितरण समारंभाला मुख्य आकर्षण बुध्दिबळाची पुणे शहरातील खेळाडू भारताची पहिली सोळा वर्षाखालील जागतिक बुध्दिबळ विजेती महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणे, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री जयंत गोखले, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त कार्याध्यक्ष जोसेफ डिसुजा पुणे जिल्हा बुध्दिबळ संघटना, सचिव राजेंद्र कोंडे पुणे जिल्हा बुध्दिबळ संघटना, आंतरराष्ट्रीय पंच (अ दर्जा प्राप्त) श्री नितीन शेणवी मुख्य पंच इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

खुल्या गटात श्री रोहन जोशी साडेआठ गुण करून निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्याच बरोबर श्री सिद्धांत गायकवाड, श्री अन्जनेया फाटक आणि श्री सिध्दांत ताम्हणकर हे पुणे जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य निवड चाचणी मध्ये प्रतिनिधित्व करतील.